web-ads-yml-728x90

Breaking News

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव कोल्हापुर

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या 24 तासांपासून तर जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू असून पंचगंगेच्या पाण्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 46.01 फुटांवर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी आणखीनच रौद्र रूप घेण्याची शक्यता आहे. धोका पातळी पेक्षाही 3 फूट वरून पंचगंगा नदी वाहू लागली असल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुर जिल्ह्यात सध्या 2 एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या चिखली गावात त्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

No comments