web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलसाठी मोठा प्रतिसाद हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे द्योतक – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढणे हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचेच द्योतक आहे, अशा पद्धतीच्या शाळा राज्यात सर्वत्र असाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

       दिंडोशीमधील मुंबई महानगरपालिका पब्लिक स्कुलच्या नव्याने उभारलेल्या इमारतीचे लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, भाई जगताप, मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर आदी उपस्थित होते.

No comments