web-ads-yml-728x90

Breaking News

सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने लसीकरण अधिक गतिमान करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न करून लसीकरण गतिमान करावे, अशी सूचना पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह आज श्री ठाकरे यांनी लसीकरणासह शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, पी.वेलरासू, सुरेश काकाणी, डॉ.संजीव कुमार, सहआयुक्त श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त राजन तळकर, अजय राठोर आदी उपस्थित होते.

No comments