डोंबिवलीत मनसेच्या लसीकरण मोहिमेला जोरदार सुरवात
BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण
एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा प्राप्त न झाल्याने बंद आहेत. तर दुसरीकडे मनसे तर्फे आज कल्याण ग्रामीण भागात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यँत 2 हजार नागरिकांचे निशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. आज लसीकरणास रिक्षा चालकांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेचे लसीकरण केंद्र तर दहा बारा दिवस बंद राहणार असतील तर कसं काय ब्रेक द चैन काराल, केंद्र सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जोपर्यंत लसींचा साठा प्राप्त होत नाही तोपर्यंत नवी मुंबईच्या पार्श्वभूमीवर लस विकत घ्याव्यात, कोव्हीड सेन्टरवर करोडो रुपये खर्च करता मग लसिकरनावर का केला जात नाही असा सवाल केला. तसेच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा ड्राइव्ह घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी राजू पाटील यांच्या आमदार निधीतून कार्डीक रुग्णवाहिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भेट म्हणून देण्यात आली. या रुग्वाहीकेचे लोकार्पण केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
No comments