web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या  शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.15 एप्रिल ते 7 जुलै या काळात 1 कोटी 21 लाख 76 हजार 930 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती पाहून राज्य शासनाने निःशुल्क शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 01 लाख 13 हजार 257 थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात सद्यस्थितीत 1093 शिवभोजन  केंद्र सुरू आहेत.

No comments