web-ads-yml-728x90

Breaking News

महिलांनो तुम्ही कमकुवत नाहीत, आत्मनिर्भर व्हा, महाराष्ट्र पोलीस तुमच्या पाठीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव सातारा

महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा,महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहिल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. येथील अलंकार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (ऑनलाईन), पोलीस महासंचालक संजय पांडे (ऑनलाईन),  विशेष पोलीस महासंचालक (महिला व बाल) राज वर्धन (ऑनलाईन), जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.

 

No comments