मुरबाड मध्ये मिलिंदाचा गुटखा,बनावट शितपेय धंदा तेजीत....!
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे
शासनाने वसुली वाझे घटनेत अतिदक्षता घेतल्याचे दिसत नसुन प्रत्येक विभागात वसुली वाझे हे सुत्र माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खर असल्याचं दाखवुन दिलं आहे.त्याचा सामान्य माणसाना त्रास होतोय मात्र सरकारी अधिकारी आणि पुढारपणाचे लागेबाधे बाहुलबचे यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे.अशाच प्रकारे काही वर्षापासून लोकप्रतिनिधीच्या घोंगडी खालून आणि संबधित विभागाच्या गोदडी खालुन मुरबाड मध्ये मिलिंदाचा गुटखा बनावट शितपेय धंदा तेजीत चालला आहे.त्याच्याकडुन वसुली करणारे संबधित पोलिस यंत्रणा आणि अन्न औषधे नियंत्रण अधिकारी हप्ता वसुली करत असल्याने मुरबाड शहरासह तालुक्यात बनावट शितपेय आणि गुटखा आरोग्याचे कारण बनले आहे.
एका कंपनीची एजन्सी घेतल्याचे दाखवुन त्याच्या नावाखाली बनावट शितपेय विक्री करणारा मिलिंदाचा अडडा भररस्त्यावर संबधित यंत्रणाना कसा दिसत नाही त्याला परवानगी कोणी दिली याकडे दुर्लक्ष करणार्या सर्व संबधित अधिकार्याना निलंबित केले पाहिजे अशी मांगणी जोर धरू लागली आहे.सध्या कोरोना कालावधीत घशाचे आजार सर्दी ताप त्यातच फुडपॉईजन प्रकार बनावट शितपेय थंडा तसेच बनावट बिस्लरी पाणी सोडा अन्य थंडपियातुन होत असल्याचे निदर्शनास येत असुन हप्तेखोर संबधित अधिकारी बनावट थंडपिये मिलिंदाच्या कडुन सार्या शहराची तालुक्याची वसुली करून घेत असल्याची माहिती समोर येत असुन हाच मिलिंद तालुक्यात गुटखा किंग असल्याचे बोलले जातयं त्याच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सामाजिक संघटनेने दिला आहे यातील वसुली वाझे निलंबित करावे अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने शासनाकडे केली आहे.
No comments