web-ads-yml-728x90

Breaking News

काळू धरणाला कायम विरोधच;माझ्यासह सर्व शेतकऱ्यांचा या धरणाला विरोध - आमदार किसन कथोरे

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमंत्रालय,मुंबई

मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव कथोरे हे नेहमी मुरबाडाच्या विकासासाठी व येथील जनतेसाठी तत्पर असतात याचा उदाहरण आज आला आहे.मंत्रालयात आज दि. २० जुलै २०२१ रोजी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे दालनात आयोजित बैठकीमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदन केले.शेतकर्यांची बाजू मांडताना आमदार किसन कथोरे यांनी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांचा या धरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

मुळ शेतकरी सोडून तुम्ही धनदांडग्यांना मोबदला देणार असाल तर आम्ही हे धरण होऊ देणार नाही,असे ठणकावून सांगितले.पुनर्वसन करताना सुद्धा नाकी नऊ येतात,याचा अनुभव आमच्या पाठीशी आहे.त्यामुळे पुनर्वसनाचा आणि मोबदला देण्याचा प्रस्ताव अगोदर आम्हाला द्या,मग शेतकर्यांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ.तोपर्यंत २०११ नंतर काळू धरणाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर ज्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झालेत,त्यांची आणि ११/३ ची नोटीस व्यपगत केलेल्या पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी करत या धरणाला आमचा विरोध कायम असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी स्पष्टपणे सांगितले.यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार.किसन कथोरे, जलसंपदा सचिव, जलसंपदा मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

No comments