web-ads-yml-728x90

Breaking News

माळशेज घाटात वाहतोय कोटीचा धबधबा निर्लज्ज प्रशासन,ठेकेदार,भ्रष्टसरकार माळशेज घाटात धबधब्याचा प्रवाह बनला जिवघेणा कोणाला नाय पडलयं घेणादेना

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

काँग्रेस राष्ट्रवादी पासुन आजच्या महाविकास आघाडी तिघाडी आणि मागील भाजपा सेना  बिघाडी सरकारच्या कालावधीत माळशेज घाटाच्या नावे पोट भरणा-यांना खुप संपत्ती टक्केवारी मिळवून दिली मात्र आजही माळशेजघाट अपघातग्रसतच आहे. पर्यटकाच्या प्रवाशाच्या नावाखाली घाटात जाळी आणि पयर्टनाची भुलवणी दरवर्षी संरक्षण भिंती नवे रस्ते मात्र रस्त्यावर नदीनाल्यासारखे खड्डे याकउे दुर्लक्ष करणा-या निर्लज्ज् भष्टाधिकारी ठेकेदार यांना पोसण्याचे काम प्रत्येक भष्टाचारी टक्केवारी सरकारने केले यापेक्षा अद्याप काय करणार हे आजही  रस्त्यावरील खड्डयातून दिसुन येत आहे.

          माळशेजघाटात पडलेले खड्डे दुस-याबाजुने कोसळणारा रस्ता प्रवाशांना जीवघेणा ठरतम आहे. मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारे , पुढारी आणि भष्टाचाराने संपत्ती ळिवणारे अधिकारी ठेकेदारी यांच्रूावर सरकार सुध्दा पक्ष-पार्टी टक्केवारीचा साज चढवुन काहीही कारवाई करत नाहीत म्हणून माळशेजघाटात कोटी रूपये खर्च होऊन सुध्दा रस्त्यावरून धबधबे वाहतात असे खड्डे पडले आहेत खड्डयाचा प्रवाह धबधबे नाले सारखा दिसत आहेत. वाहने कशी चालवली जातात प्रवाशी जिव मुठीत धरून जातात यासाठी बांडगुळे पुढाकार घेत नाहीत. त्यांना कसय घेना देना पडलाय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

          कल्याण मुरबाड माळशेज घाट रसत्याचे चौपदरीकरण टेंडर निघाला होता त्या निधिचा भष्टाचार काय झाला त्याकडे दुर्लक्ष झाले पैसा कमवून देणारे अधिकारी राजकीय लोकप्रतिनिधी मंत्री ठेकेदार आपल्या टक्केवारीच्या थैलीसाठी इकडून तिकडे तिकडून इकडे बदल्या करून नेतात तसाच प्रकार माळशेजघाटात घडला असून  नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोटी रूपये देवून माळशेजघाटाच्या निधित भष्टाचार करण्यासाठी आले आहेत.

          सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले महाजन यांनी मुरबाड शहापुर कर्जत रस्त्यात कोटीचा भष्टाचार केला नेत्यासह ठेकेदारांना पैसा कमावून दिला त्यांनाच माळशेजघाट रस्त्याचा चार्ज दिल्याने त्यांनी कोटीच्या भष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याने माळशेजघाट जिवघेणा खड्डेमय झााले आहे या माळशेजघाछावर कोटी रूपये खर्च होत असताना 2 ते 3 कोटीचा निधी खड्डे बुजवण्यावर टेंडर काढला असताना घाटात जिवघेणे खड्डे कसे या भष्टाचाराकडे तिघाडी दुर्लक्ष करत असुन ठेकेदार अधिकारी लोकप्रतिनिधीची मर्जी सांभाळुन लोकाचं जीव घेत आहेत. अशा बेजबाबदार अधिकारी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस सरकारने करावे अशी मागणी होत आहे.  मुरबाड भुमिअभिलेख कार्यालयाच्या सुशोभिकरण संरक्षण भिंती बांधकामाच्या टेंडर खर्चापासुन तेथील चाललेला मनमानी भ्रष्ट कारभाराला आळा घालावा तसेच भिवंडी भुमिअभिलेख कार्यालयातील अविनाश गुप्ते यांनी आतकोली भादाणे येथील शेतकर्याच्या जमिनीच्या भुमिअभिलेखाच्या नकाशा कागदपत्रात फेरफार बद्दल केला आहे गरीबाच्या जमिनी हाडप केल्या आहेत त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मांगणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.

No comments