web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचं भुमिअभिलेख म्हणजे माकडाच्या हातात कोळीत गरीबाची लुटमार श्रीमंताचा मायाजाळ

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमंत्रालय,मुंबई

भ्रष्टाचाराला सिमा नाही आणि आता तमा सुध्दा राहिलेली नाही भुमिलेख म्हणजे कागदपत्र अर्ज चौकशा गायब आणि वाट पहात बसलाय मायाजाळाचा साहेब यावर सरकार कारवाई होत नाही दुसरीकडे गोडबंगाळ घाटक राजकीय पिंडधारी त्यातुन मुरबाड भिवंडी भुमिअभिलेख कार्यालयात गरीबांची लुटमार सुरू आहे.श्रीमंताची मोजणी तात्काळ होते त्यांचे टपाल तात्काळ बनते मात्र गरीबाना फेया मारून वर्षानुवर्षे समस्या पिढीत ठेवणार्या या मुरबाड आणि भिवंडी भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी अधिकार्याची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबत करावं अशी मांगणी सामाजिक संघटनानी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

              मुरबाड भुमिअभिलेख कार्यालयाकडे मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाग्याची मोजणी करून घ्या असा आदेश तहसिलदार मुरबाड यांनी दोन वर्षापुर्वी काढले होते मुरबाड जिल्हापरिषद शाळेच्याभिंती लगत दुबारा गाले अनधिकृत बांधले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनधिकृत गाले बांधले यांची मोजणी झाली नाही अशा अनधिकृत बांधकामाना मुरबाड भुमिअभिलेख कार्यालय जबाबदार असुन जुने आकारबंद 9/3,9/4 ची प्रत मिळत नाही असे दाखले देवुन अनधिकृत बांधकामाना प्रोत्सहान दिले आहे.ज्याचे भुमिअभिलेख नकाशे नाहीत त्याचे कागदपत्र मिळत नाहीत मग तेचे पाच मजली इमारती कशा उभ्या राहिल्या याचा विचार सरकारने केला पाहिजे.

                      सरकारचे भुखंड लाटणार्या भाडखावुना किती पाठिशी घालायाचे शासनाच्या भूखंड गिळगुत करण्याचा डाव आणि वनजमिनी गिळगुत करण्याचा डाव श्रीमंत योगी राजकारणी प्रशासकीय कर्मचारी अधिकारी एमआयडीसी अधिकारी करत असताना काहीही कारवाई होत नाही मात्र आदिवासीना न्यायालयाने दिलेली गावठण जागा प्लॉट याची मोजणी करून त्यांना जागा दिली जात नाही सरकार कोणासाठी चांगलं यापेक्षा कशा पध्दतीने चांगलं हे जनमानसाच्या लक्षात आल्यावर सुडबुध्दीचा पोलिसी किंवा खोटे आरोप प्रत्यारोप गुन्हे दाखल करून खडसे होण्याचा मान मिळवणार्याना देव माफ करणार नाही गरीबाची तळतळाट तुमच्या मोठेपणाला झोपू देणार नाही याची काळजी सरकारच्या नांवावर अशा अधिकार्याना प्रोत्सहान देणायानी घ्यावी यापेक्षा गरीबाचं दुदैव काय

    मुरबाड भुमिअभिलेख कार्यालयाच्या सुशोभिकरण संरक्षण भिंती बांधकामाच्या टेंडर खर्चापासुन तेथील चाललेला मनमानी भ्रष्ट कारभाराला आळा घालावा तसेच भिवंडी भुमिअभिलेख कार्यालयातील अविनाश गुप्ते यांनी आतकोली भादाणे येथील शेतकर्याच्या जमिनीच्या भुमिअभिलेखाच्या नकाशा कागदपत्रात फेरफार बद्दल केला आहे गरीबाच्या जमिनी हाडप केल्या आहेत त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मांगणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.

No comments