web-ads-yml-728x90

Breaking News

न्याय देवता देवदूत देव माणुस भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर


BY : गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव-  भिवंडी 

ज्यांनी जिव लावला,ज्यांनी स्वतः उपाशी राहून मुलीचे संगोपन करून लग्न लावून दिले अशी मुलगी व तिचा पती जेव्हा पैशाच्या मोहात येऊन अश्‍चर्यचकित कृत्य करतात तेव्हा अशा आई वडिलांना न्याय मिळवून देणेकरिता देवाला भूतलावर न्यायदेवता म्हणून आपला साक्षात्कार घडवून चमत्कार करावाच लागतो असाच चमत्कार भिवंडी येथे घडला आणि या चमत्काराचे सार्थ भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांच्या न्यायेतून निर्णय देऊन पुन्हा समोर आहे आहे.

ही घटना दोन दिवसापुर्वीची भिवंडीतील ब्राम्हण आळी येथील आहे या घटनेत चक्क स्वतःच्या मुलीने व तिच्या पतीने सासू सासरे यांची प्रॉपर्टीवर डोळा ठेवला.आई वडिलांनी संपूर्ण आयुष्य घालवून मोलमजूरी करून घरकाम करित वयोवृध्दापर्यंतची जमापुंजी 5लाख 30 हजार इतकी साठवून ठेवून त्या घामाच्या पैशातून स्वतःसाठी सन 2016 साली घर खरेदी केले परंतू त्या घरावर जावय व मुलीचा डोळा असता व तिच्या आई वडिलांना लिहता व वाचता येत नाही तर वडिल मनोरूग्ण असून तुमचे सुनांसोबत भांडणं होत आहे त्यामुळे ते घेण्यात येणारे फ्लॅट माझे नावावर खरेदी कर आणि तिथे तूच रहा असे सांगितले तेव्हा आईचा जीव मुलांसाठी कसा असतो हे सर्व जगालाच माहिती आहे या मायेच्या सावलीचा फायदा घेऊन ते घर त्या मुलीच्या नावावर खरेदी केले व तद्नंतर त्या मुलीच्या पतीने कुलमुख्त्याधारक पत्र बनवून ते घर जावयाच्या नावावर करून घेतले.नंतर त्या घराचा कब्जा जावयाच्या हातात गेल्याने सासू सासरे यांना शिवीगाळी व धमकावणे प्रकरणे सुरू झाली.सदरहू त्रास हा होत असल्याने त्या सासू सासरे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार सांगितले.तेव्हा सदरहू तक्रार ही दाखल झाली.परंतू जैसे थे वैसेच.पुन्हा मुलीसह जावयाने त्या आई वडिलांना घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वयोवृध्द महिलेने ज्येष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरणाकडे धाव घेऊन घरातून बेदखल करू नये म्हणून आम्हास भत्ता मंजूर करावा या करिता अपील दाखल केला.


            या अपिलाच्या दालनात न्याय देवता देवदूत पीठासीन अधिकारी तथा भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांचेसमोर हे प्रकरण आले असता सुनावणी घेतली तेव्हा वास्तविकता तपासून व परिपुर्ण माहिती प्राप्त करून दोन्ही बाजू एैकूण घेतले तेव्हा अर्जदार व त्यांच्या कुटूंबियांना ब्राम्हण आळी येथील असणार्‍या घरातून दिवाणी न्यायालयातील अंतिम निकाल होई पर्यंत मुलगी व जावई हे आई वडिलांना त्या घरातून बेदखल करणार नाहीत असे सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने आईवडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलीची सुध्दा आहे याचा हवाला देऊन जन्मदात्या आई वडिलांना त्यांच्या घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या मुलीसह जावयास फटकारले असून न्यायालयीन निर्णय लागेपर्यंत त्यांना घरातून बेदखल न करण्यासोबतच दरमहा चारितार्थासाठी तीन हजार रूपये देण्याचे आदेश पारित केले.


            या निर्णयामुळे त्या आई वडिलांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांचे आभार मानून त्यांच्या या धाडसी निर्णयाचे गुणगान गायले.कायद्दयाची अंमलबजावणी होत असतांना निर्णयही महत्वपुर्ण आहे आणि त्या निर्णयाला वेळ लागले तरी तो सत्याच्याच बाजूने लागतो.या प्रकरणात जरी निर्णय लागला नसेल तरी खरा न्याय हा मिळाला हे मात्र नक्कीच. भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांच्या विविध सुनावणीच्या धडाडी निर्णयामध्ये जास्त प्रमाणात आई वडीलांना न्याय मिळवून देणारा निर्णय पाहण्यात आले आहे त्यामुळे न्यायाधिकारण तथा न्यायदंडाधिकारी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांच्या या न्यायदेवताच्या रूपाने देवमाणुस हा सर्वांना पाहायला मिळत आहे.

No comments