web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशी-परेदशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांविषयी आकर्षण निर्माण होवून पर्यटन विकसित होण्यास मदत होणार आहे.याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांना भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार 4 आणि 5 तारांकित पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याबरोबर भागिदारी होणार आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. अम्युझमेंट पार्क, साहसी क्रिडा, वॉटर पार्क आदी विकसित होणार आहेत. महाराष्ट्राची लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे.

No comments