web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या रोहन गोखले यांचा शिवसेनेने केला सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

मेघदूत सोसायटी, कोपरी, ठाणे पूर्व, येथिल रहिवाशी श्री.रोहन आनंद गोखले यांनी करोना काळात(०६ डिसे. ते २४ एप्रिल ) करोनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतातील २८ राज्य, सहा केंद्रशासित प्रदेश असा २५ हजार ५२५ किलोमिटरचा साहसी प्रवास त्यांच्या दुचाकीवरुन १४० दिवसात पूर्ण करत भारत भ्रमंण केले.  तसेच रोहन आता ६० दिवसांच्या जम्मू-काश्मिर-लेह-लडाख प्रवासासाठी ०२ जुलै रोजी दुचाकीवरुन सुरूवात करत आहे.  दुचाकीवरूनच आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याच रोहनच स्वप्न आहे. शिवसेना कोपरी विभागातर्फे रोहन करत असलेल्या भारत भ्रमणा, तसेच भावी प्रवासासाठी शिवसेना

विभागप्रमुख गिरीश राजे यांनी, उपविभागप्रमुख श्री.प्रकाश खांडेकर, शिवसैनिक शिवसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.अजय नाईक, शंकर गौर, रंजन शिंदे यांच्यासह रोहनची सदिच्छा भेट घेऊन त्याच अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी रोहनला शुभेच्छा दिल्या.

No comments