web-ads-yml-728x90

Breaking News

पूरग्रस्तभागातील आरोग्य यंत्रणेशी आरोग्यमंत्र्यांचा संवाद

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. पूरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तत्काळ उपचार करतानाच त्यांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून आवश्यक ते औषधे, गोळ्या, वैद्यकीय पथके याबाबत माहिती घेतली. पूर ओसरल्यानंतर साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

   पूर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्याला प्राधान्य देतानाच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सविस्तर सूचना श्री. टोपे यांनी दिल्या आहेत. पूरग्रस्त भागातील विहीरींचे शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

No comments