web-ads-yml-728x90

Breaking News

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन २०२० च्या जीवनगौरव आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवन येथे होणार आहे.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान केला जातो. २०२० सालचा कृ.पां.सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) श्री. सिद्धार्थ गोदाम- न्यूज १८ लोकमत( औरंगाबाद), राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) श्री. किरण तारे – इंडिया टुडे तर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्यांकरिताचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री. चंदन शिरवाळे – दै.पुढारी यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक २० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता राजभवन येथे होणार आहे.

No comments