web-ads-yml-728x90

Breaking News

असोला मेंढा तलाव परिसर पर्यटन क्षेत्र विकासाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देऊ – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा तलाव क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाबाबत विभागामार्फत निश्च‍ित निर्णय घेऊन त्यामाध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा तलाव हा इंग्रजकालीन तलाव असून 114 वर्ष जुना आहे. या परिसरात देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याने या परिसराच्या विकासासाठी किमान 20 कोटी रु. निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात चंद्रपूर जिल्ह्यातील असोला मेंढा येथील परिसराचे सौंदर्यीकरणाबाबत बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, आर्किटेक्ट श्री.भिवागडे यांच्यासह या विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी असोला मेंढा तलाव परिसरातील सौंदर्यीकरण करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

No comments