web-ads-yml-750x100

Breaking News

वरळी परिसरातील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट; विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचाही घेतला आढावा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबईत विविध ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वरळी परिसरातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जाम्बोरी मैदान येथे आयोजित लसीकरण शिबिरांना श्री ठाकरे यांनी आज भेट दिली आणि लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.एन.एस.सी.आय. येथे आदित्य बिर्ला ग्रुपच्या सौजन्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि जाम्बोरी मैदान येथे आरपीजी फाऊंडेशन आणि सुराणा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सौजन्याने बीडीडी चाळ आणि परिसरातील रहिवाशांसाठी प्रत्येकी एक हजार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. लसीकरणासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. लसीकरणासाठी साहाय्य करणाऱ्या सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, वैद्यकीय पथकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

No comments