web-ads-yml-728x90

Breaking News

बहिणी सोबत प्रेमसबंध असल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाचा खुन;स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण कर्तव्यदक्ष पोलिसांनी लावला खुनाचा छडा...!

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

७ जुलै २०२१ रोजी पडघा सापे गावच्या हद्दीत एका २२ वर्षीय अनोळखी तरुणाचे प्रेत आढळून आले होते.धारदार शस्त्राने गळा कापून त्याचा खून करण्यात आला होता.कोणताही धागेदोरे नसताना स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी या खुनाचा छडा लावून मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ७ जुलै रोजी पडघा सापे गावच्या हद्दीत अनोळखी तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती.

         या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस उपमहानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते,पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रा. च्या स्मिता पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पडघा पोलीस व स्थानीक गुन्हे शाखा यांना मार्गदर्शन केले.हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भास्कर जाधव,पो. हवा.प्रकाश साईल,संतोष सुर्वे,महादेव खोमणे,सुनील कदम,प्रवीण हाबळे,म.पो.ना.निर्मला चव्हाण,पो.ना. दीपक गायकवाड,पो.शि.स्वप्नील बोडके,हेमंत विभूते,भरत शेगर यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला असून गुन्हाचा अधिक तपास पडघा पोलीस ठाणे करीत आहे.

     प्रेत कुजलेल्या अवस्थेत असतांना पोलिसांनी ओळख पटवून उल्हासनगर येथे राहणारा  दिलीपकुमार पाल याच्या खुनाचे गूढ उकळले. अथक परिश्रमाने पोलिसांनी उल्हासनगर येथीलच आरोपी विजय प्रजापती, अंकित परमार डोंबिवली, या मारेकऱ्याना मोठया शिताफीने अटक केली. आरोपी एकाच्या बहिणी बरोबर प्रेम संबंध असल्याकारणाने राग मनात धरून गुन्हा केल्याचे कबुली आरोपीनी दिली आहे.

No comments