web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या उपस्थितीत भारत-इस्रायल सहकार्य योजनेचा शुभारंभ

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टीन व इस्रायलच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी सॅमी यहाई यांच्या उपस्थितीत एका सहकार्य योजनेचा शुभारंभ मंगळवारी (दि. १३) राजभवन येथे करण्यात आला. इस्रायलचे पर्यटन मंत्रालय व इस्कॉनशी निगडीत गोवर्धन इको  व्हिलेज या संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना दहा दिवस इस्रायल येथील शिक्षण, उद्योग जगत, स्टार्टअप आदी संस्थांमध्ये भेट देऊन तेथील कार्यसंस्कृतीचा अभ्यास करता येणार आहे. इस्रायल येथील विद्यार्थ्यांना देखील अश्याच प्रकारे भारत भेटीवर येता येणार आहे.यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरंग दास, गोवर्धन इको व्हिलेजच्या सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख याचनीत पुष्कर्ण तसेच कोकण प्रांत संघचालक डॉ सतीश मोध उ‍पस्थित होते.

No comments