web-ads-yml-728x90

Breaking News

फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, फळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, पोलिस पाटील प्रकाश जाधव, बंचू बांगर, चिमा भोईर, जगन जाधव, उपतालुका प्रमुख बंधू जाधव, माजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

No comments