web-ads-yml-728x90

Breaking News

स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांना रु २५ लाखांची तातडीने मदत करण्यात यावी भाजपा युवा मोर्चाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

स्वप्निल लोणकर या युवकाची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील मुलाखात होत नव्हती. त्यामुळे नोकरी मिळत नाही. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच ढिसाळ कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली.. अश्या बेजबाबदार व निगरगट्ट सरकारचा निषेध करत मागणीची चर्चा भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेढेकर यांनी  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या सोबत केली आणि भाजप युवा मोर्चा ठाणे शहर यांच्या तर्फे निवेदनात स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांना रु २५ लाखांची तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेढेकर सोबत भाजप ठाणे सरचिटणीस मनोहर सुगधरे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस अक्षय तिवरामकर व संपर्क प्रमुख बिपीन गेहलोत उपस्थित होते.

No comments