web-ads-yml-728x90

Breaking News

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा

गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली.यावेळी  श्री. शंभूराज देसाई यांच्यासमवेत माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, शिवदौलत बँकचे संचालक अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, विकास जाधव, भरत साळुंखे, चंद्रकांत पाटील, डी.वाय.पाटील,गणेश भिसे, किसन गालवे यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

         गेल्या दोन तीन दिवसांपासून पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेत जमिनी, पिके यांचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढ्यांसह नद्यांना पुराचे पाणी  येऊन पोहोच रस्ते, साकव पूल, शेत जमिनी यांचे मोठे नुकसान झाले असून गाव पोहोच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी पडण्यासह साकव पूल वाहून गेल्याने तसेच रस्ते खचल्याने डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे दळण वळण ठप्प झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागामध्ये असलेल्या गावांचे आसपास भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या असल्याने डोंगराचा भाग व कडा कोसळण्याची  भिती असलेल्या गावांतील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करुन नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली.

No comments