web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई शहर कामगार उप आयुक्तांमार्फत घरेलू कामगारांना माहिती अद्ययावत करण्याबाबत आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत नोव्हेंबर 2011 ते 31 मार्च 2014 पर्यंत घरेलू कामगारांची नोंदणी मॅन्युअल पध्दतीने करण्यात आली होती. मॅन्युअल नोंदणी दरम्यान घरेलू कामगारांचे बँकेचे तपशील घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या कालावधीत आणि यानंतर नोंदणी केलेल्या सर्व घरेलू कामगारांनी आपली माहिती http://public.mlwb.in/public  या लिंकवर अद्ययावत करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे.  तसेच नोंदणी करतांना अडचण आल्यास कामगार उप आयुक्त कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

No comments