web-ads-yml-728x90

Breaking News

मुसळधार पावसाने ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली, पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागातघडलेल्या दुर्घटना ताज्या असतानाच ठाण्यातही भिंत कोसळली. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

No comments