web-ads-yml-750x100

Breaking News

उल्लेखनीय व यशस्वी काम करणाऱ्या लोकांनी विनम्रता अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिररच्या “भारत लिडरशिप अवार्ड 2021 ” चे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन कॅम्पस वाघोली, पुणे येथे  झाले. त्यावेळी श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी लेक्सिकॉन ग्रुपचे चेअरमन सुखदेव शर्मा, पुणे टाईम्स मिररचे अध्यक्ष पंकज शर्मा, पुणे टाईम्स मिररचे उपाध्यक्ष नीरज शर्मा, प्रा. अनिरुध्द देशपांडे, अवार्ड विजेते व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

No comments