web-ads-yml-728x90

Breaking News

महावितरणच्या सासवड विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सादर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

हवेली तालुक्यातील (जि. पुणे) 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.महावितरणच्या सासवड विभागाची पुनर्रचना तसेच भोर उपविभागाचा मुळशी विभागात समावेश करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने सह्याद्री राज्य आतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोरचे आमदार संग्राम थोपटे व सासवडचे आमदार संजय जगताप यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते तर पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

No comments