web-ads-yml-728x90

Breaking News

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यास, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रदान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव देबडवार, अन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह आधी उपस्थित होते.

No comments