web-ads-yml-728x90

Breaking News

नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा शहापूर मधील पुरगस्त भागाचा केला दौरा…

 

BY - युवा  महाराष्ट्र  लाइव शहापूर

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी शहापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून पुराने बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट दिली. या गावातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून त्यांना मदत देण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्याया भागातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांचे प्रवाह अचानक वाढल्याने काही गावांचा भुभाग पाण्याखाली गेला होता.

चरिव गावाला भेट देऊन तिथे अन्नधान्याचे किट्स, सतरंज्या, चादरी यांचे वाटप केले. तर आल्याणी गाव दरवर्षी काळू नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यावर पाण्याखाली जात असल्याने त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत विचार करू असे ग्रामस्थांना आश्वस्त केले. चरिव गावातील कु. भूषण गायकर या २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याचे आजोबा आणि बहीण पोरके झाल्याने शिवसेनेच्या वतीने त्याच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत देऊ केली, त्यासोबत त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलल्याचे जाहीर केले.कसारा येथील वेलूक -वाशाला नदीवरील पूल ,शहापूर -सापगाव भातसा नदीवरील धोकादायक पूल तातडीने दुरुस्त करण्यासोबतच नवीन पुलाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे निर्देश एमएसआरडीसी ला दिले.

No comments