web-ads-yml-728x90

Breaking News

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव सोलापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले उपस्थित होते.श्री.शंभरकर यांनी आषाढी कालावधी, शासकीय महापूजा, वारकरी, पायी वारी याबाबत माहिती दिली.आषाढी यात्रेचा कालावधी 11 ते 25 जुलै 2021 असा राहणार आहे. आषाढी यात्रा मंगळवार दि. 20 जुलै 2021 रोजी होणार आहे. याच दिवशी श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे 2.20 ते 3.30 पर्यंत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments