web-ads-yml-728x90

Breaking News

‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो,  असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

No comments