web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात 8 तास वीजपुरवठा खंडित होत असून टोरंट विजकंपणीचे या कडे आद्यप दुर्लक्ष

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव -  ठाणे

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरात जवळ जवळ 4 ते 5 लाख लोकसंख्या असून सुद्धा दिवा शहर अनेक सुख सुविधेपासून वंचित आहेत.त्यात भरीस भर म्हणून दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित केला जात आहे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून दररोज कामाला जाणारे नोकरदार वर्ग,महिला ,लहान मुले अपुऱ्या झोपे मूळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असून निद्रा नाश ,मानसिक त्रास असे अनेक रोग उधभवण्याची शक्यता आहे.एन रात्रीत केव्हांवी वीजपुरवठा काहीही कारणामुळे खंडित केला जातो विचारणा केली असता टोरंट वीज कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करतात या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्येचं निराकरण करावं असे मत समस्त दिवेकरांनी व्यक्त केला अन्यथा दिवावासीयांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा थेट इशारा रहिवासीयांनी दिला.

No comments