web-ads-yml-750x100

Breaking News

कळवा भागात दरड कोसळून 5 जण ठार तर अनेक जखमी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथं डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.कळवा पूर्व  येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे.  यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात  1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव  देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

No comments