web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान ” न “दिल्यामुळे 14 जणांचे राजीनामे..

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान ” न ” दील्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.

‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीडमध्ये भाजपमध्ये मोठे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.खा.डॉ प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान ” न “दिल्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सर चिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान ” न ” दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात हे अवलंबून आहे

No comments