web-ads-yml-750x100

Breaking News

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याचे वितरण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील  पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याचे 55% आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचे 43% वितरण पूर्ण करण्यात आले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना प्रति सदस्य प्रतिमहा 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे नियमित वितरण करण्यात येत असून दि.05.06.2021 पासून आतापर्यंत 8,482 मे.टन तांदूळ आणि 12,428 मे. टन गहू इतक्या अन्नधान्याचे 55% शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र लाभार्थ्यांना माहे जून 2021 करिता नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात असून दि.05.06.2021 पासून आतापर्यंत 7,256 मे.टन तांदूळ व 11,181 मे.टन गहू इतक्या अन्नधान्याचे 43% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात आले आहे.

No comments