वादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहोबाजूंनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते त्याचबरोबर जो वादा ऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहोबाजुनी रक्षण करतो तोच खरा नेता होवू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी प्रत्यक्ष उपस्थित होते तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.
No comments