web-ads-yml-728x90

Breaking News

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तृतीयपंथीचे लसीकरण

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून तृतीयपंथीसाठीचे राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्कींग प्लाझा येथे संपन्न झाले.

     यावेळी उप महापौर सौ.पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू  टावरी आदी उपस्थित होते.

      शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते.

      या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली.आज एकूण शहरातील १६ तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

No comments