web-ads-yml-728x90

Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झालेली आहे. शेतपिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रान डुक्करांबाबतच्या धोरणात बदल करून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मानवी पशुहानीबाबत प्रलंबित नुकसान भरपाईबाबत बैठक झाली.

No comments