web-ads-yml-750x100

Breaking News

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी आदर्श व मार्गदर्शक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य आमच्यासाठी सामाजिक न्याय विभागासाठी आदर्शवत, प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. तसेच यानिमित्त साजऱ्या केल्या जात असलेल्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.राज्य सरकारच्या वतीने यावर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांनी लोक कल्याणासाठी घेतलेले विविध निर्णय, त्यांची दूरदृष्टी स्पष्ट करणारी कामे, संस्कृती, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा आदी क्षेत्रात दिलेले योगदान तसेच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले प्रयत्न या सर्व कार्याचे स्मरण प्रत्येक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे करण्यात येत असून, समाज माध्यमांवर देखील #लोकराजाशाहू #सामाजिकन्यायदिन हे रॉन हॅशटॅग वापरून विशेष अभिवादन करण्यात येत आहे.

 

 

No comments