web-ads-yml-728x90

Breaking News

शहरातील १३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दोन दिवसात माजिवडा - मानपाडा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीमधील एकूण १३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान यापुढेही सर्व प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

    या कारवाईतंर्गत  कासारवडवली येथील ८ अनधिकृत दुकाने गाळे व १ खोलीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर बाळकूम येथील इमारतीमध्ये ३ अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समितीमधील १ बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

      सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी  अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

No comments