web-ads-yml-750x100

Breaking News

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नरेश म्हस्के आणि ग्रँण्ड मराठा फाउंडेशनच्या वतीने ठाण्यातील कुष्ठरूग्णांना व दिव्यांग बांधवांना शिधावाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

 कोपरी येथील कुष्ठरूग्ण वसाहत, गांधी नगर, कोपरी येथील  कुष्ठरूग्णांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तर तीन हात नाका येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे दिव्यांग बांधवांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 हिंदह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जरी राजकारणात असलात तरी   ८०  टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिकवण दिली. कोरोना काळात देखील गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त नरेश म्हस्के व ग्रँण्ड मराठा फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रँण्ड मराठा फाउंडेशचे अध्यक्ष राजेश तावडे, अंबरनाथचे शाखाप्रमुख अरविंद मालुसरे, उपविभाग प्रमुख रमण बटवले, शाखाप्रमुख विजय पाटील, महादेव पवार, प्रभाकर मेहेत्रे, कांती नाईक,   दिव्यांग सेनेचे शरद पवार, गिरिष मेहरोल, राजू आम्ले तसेच प्रहार दिव्यांग सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments