web-ads-yml-728x90

Breaking News

दोस्ती रेंटल हौसिंग इमारतीतील नागरिकांचे घाणीत वास्तव्य,पालिकेचे दुर्लक्ष

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

पालिका प्रशासनाने धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घराबाहेर काढून त्यांचे वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हाऊसिंग योजनेच्या घरांत स्थलांतर केले आहे. मात्र, रेंटल हाऊसिंगच्या इमारतींभोवती कचऱ्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य,प्रवेशद्वारावरच पडलेला खड्डा, तुटलेल्या लाद्या,तुटलेले ड्रेनेज बघून येथील रहिवाशांकडून आगीतून फुफाट्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.ठाणे शहराच्या विविध भागांतील दुर्घटनाग्रस्त इमारतींतील कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जाऊ नये यासाठी रेंटल हाऊसिंग योजनेतील घरे त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दूषित पाणी पुरवठा,वारंवार बंद असणारी लिफ्ट, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आदी प्रकारांमुळे आधीच रेंटल हाऊसिंग योजनेची प्रतिमा मलिन झालेली आहे. मात्र प्रशासनाने त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे दोस्ती रेंटल हाऊसिंग योजनेच्या इमारतींच्या आवारात फिरल्यास लक्षात येते.रेंटल हाऊसिंग योजनेच्या इमारतीमध्ये नागरिकांना पाणी समस्या तसेच इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा,तुटलेल्या लाद्या त्यामुळे निर्माण झालेला खड्डा त्यात साचलेले दूषित पाणी,कचऱ्याचा ढीग,तुटलेली ट्रेनज आदी समस्यांमुळे येथे राहणारे नागरिक त्रस्त आहेत.ठाणे महापालिका भाडे वेळेवर गोळा करते परंतु नागरिकांना सेवा मात्र देत नाही वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अक्षरशः घाणीत राहावे लागत आहे.अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली

 

No comments