web-ads-yml-728x90

Breaking News

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत मेडीकल कॉलजेसह अन्य कॉलेजचे विद्यार्थी मुगबळ पालक हातबळ संचालक प्राचार्य मालामाळ शिक्षणमंञ्याची पळापळ

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

कोरोनाच्या आधाराने 10वीच्या विद्यार्थ्याला नांगराचा रस्ता दाखवला 12 वीच्या विद्यार्थ्याला दुकानाचा बस्ता दाखवला मेडीकल डिग्रीच्या विद्यार्थाना औषधाचा खोका दाखवला कॉलेजच्या संचालक प्राचार्याने संपुर्ण फीसचा आस्थापना दाखवला यावर कोणी काहीच नाही बोलला अशा शिक्षणाचा बटयाबोळ काळ सोकावला तरी चालेल मात्र म्हातारी मेली नाही पाहिजे असा शिक्षणाच्या पंढरीचा झाला आहे.

   कोरोना संगळयाची खबरदारी होती शासनाची जबाबदारी होती काय गुन्हा त्या बालकांचा त्यांची शिक्षणात बेजबाबदारी होती घेतलेल्या जबाबदारीतही पालकांची मजबुरी होती त्याची आपुलकी सरकार सह दानशुराना आली नाही हे महाराष्ट्राच्या विद्यार्थी पालकांचे दुदैव म्हणावं लागेल.

न्यायालयाने विद्यार्थीपालकाकडुन संपुर्ण फीस घेवु नये असा आदेश असताना अनेक शाळेत त्याचा बोजबारा उडाला पालकानी मोर्च काढले त्याचप्रमाणे पुणे युनिर्व्हसिटी अंतर्गत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुध्दा प्रत्यक्ष प्रॅक्टीकलचा लाभ मिळाला नाही संपुर्ण वर्षे कोरोनाने ऑनलाईन शिक्षणात गेले मात्र विद्यार्थ्याना फीस मध्ये सुट मिळाली नाही.आणि दानशुरानी मुख्यमंत्री फंडासह अनेक ठिकाणी मदतीचा हात दिला मात्र त्या विद्यार्थ्यासाठी कोणी मदतीस धावला नाही याबद्दल पालकानी खंत व्यक्त केली.उच्च शिक्षणमंत्री यांची भुमिका समोर आली नाही शासनाने शाळाना अनुदान दिले असेल मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष वेधले नाही त्यांना कोरोना कालावधीत फी माफ केली नाही हा कॉलेज दोष नसावा मात्र शासनाचा दोष नकीच आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही.शिक्षणाचा बटयाबोळ झाला आहे 10 वी पास झालेला विद्यार्थी उदया किती कॅपीबल बनेल त्याची टक्केवारी कमीच असेल मात्र बारवीचा विद्यार्थी सुध्दा व्यवसायाकडे वळण्याएवढा सक्षम असेल यात शंका नाही त्याच प्रमाणे मेडीकल डिग्रीचा विद्यार्थी नुसत्या खोक्यावरून औषधे विक्री करणार काय असा सवाल केला जातो हा दोष कोरोनाला दयायाचा की जबाबदारीला ही सुध्दा मनमोकळी समस्या बनली आहे.शासनाने कोरोना कालावधीतील सर्व शाळा युनिर्व्हसिटी कॉलेजच्या विद्यार्थ्याची संपुर्ण फीस माफ करून शासनाने कॉलेजला निधी दिला पाहिजे दानशुर ट्रस्टने निधी दिला पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थी पालकांची आहे.

 

No comments