web-ads-yml-728x90

Breaking News

ओबीसी आरक्षणा विरोधात आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड मध्ये रस्ता रोको आंदोलन;पोलिस बंदोबस्त चोख

 

BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्था मधुन डावळले जात असल्याच्या निर्षेधात भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार किसनराव कथोरे (MLA KISANRAO KATHORE) यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तीनहात नाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोठयाप्रमाणात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.मोर्चाचे निवेदन आमदार किसनराव कथोरे यांनी तहसिलदार अमोल कदम यांना दिले.यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे,वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे व त्यांचे सर्व सहकारी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

No comments