web-ads-yml-728x90

Breaking News

भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे करण्यात आली असून आज दुसऱ्या दिवशीही भर पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान दिनांक 9 जून ते 12 जून, 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. सकाळी 11.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वंदना बस डेपो येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली.या पाहणी दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष गटनेते नजीब मुल्ला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती प्रियांका पाटील, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षा वहिदा खान, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा सौ.वर्षा मोरे, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे, सुहास देसाई, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी, सौ.नम्रता कोळी, सौ.अंकिता शिंदे, श्रीमती प्रमिला केणी, सौ.अपर्णा साळवी, सौ.अनिता गौरी, सौ.पूजा करसुळे, सौ.विजया लासे, सौ. मंगल कळंबे, कु.आरती गायकवाड, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

No comments