web-ads-yml-728x90

Breaking News

खावटी रक्कमा वाटपासाठी श्रमजिवीचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

आदिवासीना शासनाने खावटी कर्जाची रक्कम अद्याप दिली नाही त्याचे वाटप शासनाने तात्काळ प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर करावे यासाठी श्रमजिवीचे नेते मा.विवेकभाऊ पंडीत,विद्युलतातार्इ पंडीत ,राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळारामभाऊ भोर्इर ,सपाटे सर्व मुख्यपदाधिकारी नेते यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हयात एकाच वेळी असंख्य ग्रामपंचायतीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.भिवंडी शहापुर कल्याण मुरबाड वाडा आंबरनाथ ठाणे पालघर मधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर खावटी कर्ज रक्कम मुख्यमंञ्यानी तात्काळ वाटप करावी तसेच घरकुले मंजुर करावीत विविध समस्या सोडवाव्यात अशा मांगण्या करण्यात आल्या आहेत.प्रत्येक ग्रामपंचायतील कार्यकर्ते नेतृत्वाखाली कार्यकर्ते नागरिक आपला हक्क अधिकाराची मांगणी करणार आहेत.

No comments