web-ads-yml-728x90

Breaking News

ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून नागरिक केंद्रित प्रशासनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे  तसेच अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरीता देखील या प्रणाली अंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.  या प्रणालीमुळे म्हाडा व नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.यावेळी श्री. आव्हाड म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांप्रती कायम संवेदनशील आहे. त्यामुळेच २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवाशुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केले आहे. या पार्श्वभूमीवर सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरूवात म्हणजे म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे.  कारण मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार  गाळेधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

No comments