0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

पवई हा मुंबईतील हिरवाईने नटलेला महत्त्वाचा परिसर आहे. येथील तलाव परिसरात बांधण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यीकरणाच्या कामाची पर्यटन मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी पाहणी केली. निसर्ग सौंदर्य जपून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे करावीत, असे निर्देश श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आदी यावेळी उपस्थित होते.पवई तलाव परिसराचे जतन आणि सौंदर्यीकरण करताना येथे सुमारे 10 कि.मी.चा सायकल आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. येथे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध कराव्यात. अंतर जास्त असल्याने विविध ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याची सोय असावी. निसर्गाशी साधर्म्य साधणारी रंगसंगती ठेवून तसेच निसर्गाची हानी न करता हिरवाई जपून अधिकाधिक नागरिकांना आकर्षित करता येईल असे पर्यटनस्थळ विकसित करावे, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

 
Top