web-ads-yml-750x100

Breaking News

अतिवृष्टीमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

मुरबाड तालुक्यात अनेक आदिवासी खेडी पाडी असून त्यातील बहुतांश गावातील लोकांची घरे ही आजही कौलारू आहेत. निसर्गाचाच्या बदलांचा फटका या भागाला नेहमीच बसत असतो .बहुतांश या भागातील लोक हे भात शेतीवर अवलबून आहेत. इतर वेळी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातील काही गावांमध्ये लोकांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले.अशीच एक दुर्घटना शुक्रवारी धसई जवळील महाज गावा मध्ये घडली असून आनंद नागवंशी यांचे घर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊन मुळे कामधंदे नसल्या कारणाने पुन्हा घर कसे उभे करायचे हा प्रश्न सध्या आनंद नागवंशी याच्या पुढे येऊन ठेपलाय. स्थानिक प्रशासनाकडे त्यांनी अनेक वेळा घरकुल योजनेसाठी पाठ पुरावा केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांना या योजेने पासून आजही वंचित ठेवण्यात आले असल्याचे ते सांगतात. सदर घराची मी घरपट्टी भरत असून देखील मला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही या उलट जे गावात कित्येक वर्षापासून राहत नाही अश्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप नागवंशी यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे. सदर घटनेचा स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून मला तत्काळ आर्थिक मदत शासना कडून मिळवून द्यावी एवढी माफक अपेक्षा नागवंशी यांनी केली आहे.

No comments