web-ads-yml-750x100

Breaking News

३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना  शासनाने जाहीर केली आहे, अशी माहिती श्री.केदार यांनी दिली.

No comments