web-ads-yml-750x100

Breaking News

ठेकेदार माजी नगरसेवक मोहन सासे यांनी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मांगणी

                     

BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

मुरबाड मधील हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत ठेकेदारांने काँक्रेटीकरण केल्याचे व्हीडीओ समोर आला आहे यावेळी घटनास्थळी ठेकेदाराला प्रोटेक्शन देण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीचे कर्मचारी डोहळे उपस्थित होते संबधित ठेकेदार हा माजी नगरसेवक मोहन सासे असल्याचे कामगारांनी माहिती दिली असुन ठेकेदारासह नगरपंचायत कर्मचारी यांच्यावर कारवाईची मांगणी आता होत आहे.

     मुख्यकार्यकारी अधिकारी शाखा अभियंता (इंजिनियर) यांनी टक्केवारी घेऊन काढलेल्या कामांची सरकारने चौकशी करावी तसेच अपुर्ण कामे ठेवुन आपघाताला निमंत्रण देणार्‍या  ठेकेदार अधिकार्‍यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मांगणी नागरिकांनी केली असुन शहराच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधक यांनी त्यांना अभय देऊ नये असे बोलले जात आहे.जागृत नागरिकांनी शासनाकडे यासंबधित तक्रारी केल्या असुन प्रत्येक्षात घटनास्थळी चौकशी आणि माहिती अधिकाराखाली मिळणारी माहिती यातुन मुरबाड नगरपंचायतीचा कोटीचा भ्रष्टाचार सिध्द होणार आहे.सरकार आता कोणत्या पुराव्याची वाट पहाते कि आघाडी सरकारचे काही धागेदोरे भाजपाच्या हातात आहेत म्हणुन कारवाई करण्यास टाळाटाळ करते हे नागरिकांच्या निर्दशनात येणार आहे.तलावाचे गाळ उपसण्याचे बोगास काम त्याची मोजमापे त्याच तलावा खाली आदिवासीना राहण्याासाठी असलेला तात्पुरता निवारा त्यांच्यावर होणारा अन्याय मुरबाड नगरपंचायत व वनक्षेत्रपाल मुरबाड यांनी उभा केलेले बागेश्‍वरी उद्यान लावलेली झाडे त्याची जतन आणि शौचालयापासुन गटारी पर्यंत खाणारी लाच जनतेसमोर आली असुन वरिष्ठ अधिकारी व सरकार त्यांच्यावर का मेहरनजर करतात ही गंभीर बाब असुन ज्या स्वामी समर्थ मठा मध्ये आपुलकीने भक्त करणार्‍या भक्तांच्या नावावर मार्केंडे कन्ट्रक्शन त्याचा सब ठेकेदार माजी नगरसेवक मोहन सासे यांनी काढलेले बिल यावर करवाई होत नाही ही कशाच्या नावाने लुट आहे हे समजणार्‍याला इशारा काफी आहे.

No comments